Pune : पुणेकरांनी घेतला जपानी संस्कृतीचा आनंद

एमपीसी न्यूज – जपानी कलाकारांनी सादर केलेले अभिजात भारतीय संगीताचे (Pune)सादरीकरण, जपान येथील पारंपारिक कलेचे प्रदर्शन व जपानी खाद्यपदार्थ आदींचा अनुभव घेण्याची पर्वणी पुणेकर कलाप्रेमींना मिळाली.

 

निमित्त होते कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई व इंडो जपान बिझिनेस काउंसिल (आयजेबीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोन्निचिवा पुणे 2023 एक्सपीरियन्स जपान इन इंडिया’ या सांस्कृतिक महोत्सवाचे. फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर येथे नुकताच सदर महोत्सव संपन्न झाला. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष होते.

 

भारत जपान दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक (Pune)आदान प्रदान व्हावे व जपानी संस्कृतीची ओळख पुणेकर नागरिकांना व्हावी, या उद्देशाने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जपानमधून खास भारतात आलेल्या कलाकरांसोबतच भारतीय कलाकारांचे सादरीकरण देखील महोत्सवात पाहायला मिळाले.

Pimpri : उज्ज्वल भविष्य आणि समाजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी संविधानाची मूल्ये मनामनात रुजवली पाहिजेत; महापालिका आयोजित चर्चेत वक्त्यांचा सूर

महोत्सवाचे उद्घाटन कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईचे कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यसुकता यांच्या हस्ते झाले. यावेळी कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईच्या कॉन्सुलर मेगुमी सान, आयजेबीसीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, जपान फाउंडेशनचे महासंचालक कोजी सातो, फिडेलटेक सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी, आयजेबीसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधुरी, संचालक ओंकार बारी, खजिनदार प्रशांत खिंवसरा आणि सदस्या शेफाली तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. फुकाहोरी यसुकता म्हणाले की, भारत आणि जपानच्या मैत्रीचे एक प्रतीक असलेल्या पुण्यातील कोन्निचिवा महोत्सवाला येण्याची माझी खूप दिवसांची इच्छा आज अखेर पूर्ण झाली. भारत आणि जपानच्या संस्कृतीमध्ये बरेच साम्य आहे. दोन्ही देशांच्या देवतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात समानता आहेत. बौद्ध धर्म उगम स्थान असलेल्या भारताचे आणि जपानचे नाते खूप जुने असल्याची बाब यसुकता यांनी अधोरेखित केली.

महोत्सवादरम्यान ‘साडो’ ही पारंपारिक जपानी टी सेरेमनी, शोडो ही जपानी सुलेखन पद्धती, ओरिगामी हा कलाप्रकार, फुरोशिकी ही कपड्यांची घडी घालण्याची पद्धती, इकेबाना ही फुलांची सुंदर रचना करण्याची पद्धती, किमोनो हा पारंपारिक जपानी पेहाराव, जपानी कॉसप्ले हा विशेष शो, बोन ओडोरी हा नृत्यप्रकार, कराओके, फ्युजन डान्स, फ्युजन म्युझिक आणि किमोनो फॅशन शो यांसारखे कार्यक्रम संपन्न झाले. याशिवाय सांगीतिक कार्यक्रम, आर्ट शो, खाद्यपदार्थ महोत्सव देखील कोन्निचिवा पुणे 2023चे आकर्षण ठरले.

महोत्सवात झालेल्या जपानी किमोनो फॅशन शो मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री तीर्था मुरबादकर सहभागी झाली होती. ‘शोडो’ या सुप्रसिद्ध जपानी सुलेखन पद्धतीच्या आणि साडो या जपानी टी सेरेमनी तज्ज्ञ असलेल्या कजुको बरिसिक, ख्यातनाम संतूरवादक पं शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ताकाहिरो अराई, संगीत दिग्दर्शक, संगीतकार आणि जपानी तबलावादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या नोरीको शक्ती, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गुरु डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आणि गायिका फुमी नेगिशी, जपानी गायक असानो फुकूई या जपानी कलाकारांसोबत भारतीय कलाकार देखील या महोत्सवामध्ये आपली कला सादर केली. तब्बल 30 कलाकारांचा सहभाग असलेला कॉस प्ले हा विशेष कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.