Chinchwad : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त चिंचवडच्या दत्त मंदिरात दिव्यांची आरास 

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहराच्या ( Chinchwad) वतीने दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने उद्योग नगर चिंचवड येथील श्री दत्त मंदिरामध्ये  दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवामध्ये  भारत या संकल्पनेसह ओम नमः शिवाय, व भारत देशाचा नकाशा या रेखा चित्रांसह दिव्यांची सजावट करण्यात आली भगवान श्री परशुरामांच्या प्रतिमेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात  शेखर येळगांवकर व  दिलीप तांबोळकर यांच्या  शंख वादनाने झाली.  या कार्यक्रमाला चिंचवड गावातील व परिसरातील जास्तीत जास्त   ब्रह्म वृंदांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर उद्योग नगर ट्रस्टचे अध्यक्ष  सत्यनारायण ओझा व सामाजिक कार्यकर्त्यां अमृता नवले यांची उपस्थिती होती.

Pimpri : उज्ज्वल भविष्य आणि समाजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी संविधानाची मूल्ये मनामनात रुजवली पाहिजेत; महापालिका आयोजित चर्चेत वक्त्यांचा सूर

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष  सचिन कुलकर्णी , कार्याध्यक्ष  महेश बारसावडे, सुषमा वैद्य, संध्या  कुलकर्णी  राहुल कुलकर्णी,  भाऊ कुलकर्णी , सरचिटणीस  आनंद देशमुख, सरचिटणीस  शामकांत कुलकर्णी,  मुकुंद कुलकर्णी , वैशाली कुलकर्णी , आरती  कोशे ,ऋजुता कुलकर्णी, संदीप कुलकर्णी,वैभव कुलकर्णी,मयुरेश देशपांडे,  खरे  प्रवीण कुरबेट, संजय परळीकर , मकरंद कुलकर्णी या सर्वांचे सहकार्य लाभले.

सज्जनगड येथील श्री स्वामी समर्थ पादुकांचे दिनांक 8 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये शहरांमध्ये पूजन केले जाणार आहे. प्रामुख्याने यावर्षी हा कार्यक्रम प्राधिकरण भागामध्ये होणार ( Chinchwad)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.