Pune Railway : ‘त्या’ दोन लोकल प्रत्येक रविवारी राहणार बंद

एमपीसी न्यूज – प्रवाशांची मागणी लक्षात (Pune Railway) घेत शिवाजीनगर ते लोणावळा या दरम्यान दोन लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या. मात्र या फेऱ्या प्रत्येक रविवारी बंद राहणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी 12.05 वाजता सुटणारी लोकल (01592) लोणावळा स्थानकावर दुपारी 01.20 वाजता पोहोचते. तर लोणावळा स्थानकावरून सकाळी 11.30 वाजता सुटणारी लोकल (01591) शिवाजीनगर स्थानकावर दुपारी 12.45 वाजता पोहोचते.

ही सेवा आठवड्यातून केवळ सहा दिवस सुरू राहणार आहेत. रविवारी (Pune Railway) या दोन्ही फेऱ्या बंद राहणार आहे. प्रत्येक रविवारी या दोन लोकल बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Chinchwad : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

पुणे लोणावळा लोहमार्गावर दररोज दुपारी बारा ते तीन या कालावधीत ब्लॉक घेतला जातो. तर रविवारी या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जातो. ब्लॉक असल्याने लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातात. दरम्यान रेल्वे विभागाने दुपारच्या वेळेत दोन लोकल नव्याने सुरू केल्या होत्या. त्या लोकल आता प्रत्येक रविवारी बंद राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.