Pune : निर्भय बनो कार्यक्रम दरम्यान पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजपा पदाधिकाऱ्यांचा हल्ला; गाडीच्या काचा फोडून शाईफेक

एमपीसी न्यूज : पुणे येथे पत्रकार निखिल वागळे (Pune) यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. निर्भय बनो या सभेच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला असून त्यांच्यावर शाई फेक देखील करण्यात आली आहे. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्या आहेत. 

Pune Railway : ‘त्या’ दोन लोकल प्रत्येक रविवारी राहणार बंद

काही दिवसांपूर्वी निखिल वागळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यावरून त्यांना पुणेच्या निर्भय बनो सभेसाठी इशाराही देण्यात आला होता. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. भाजप नेते सुनील देवधर यांनी वागळे यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.