Pune : राज ठाकरे यांच्या नियोजित सभेवर पावसाचे सावट

एमपीसी न्यूज- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज पुण्यात होणाऱ्या सभेवर पावसाचे सावट आले आहे. काल , मंगळवारी रात्री आणि आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या मैदानात पाणी साचून चिखल झाला आहे.

राज ठाकरे याची सभा आज, बुधवारी संध्याकाळी सरस्वती विद्या मंदिरच्या प्रांगणात सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. मात्र मंगळवारी रात्री आणि आज पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या मैदानात पाणी साचून चिखल झाला आहे.

वास्तविक या मैदानावर काल भुसा टाकून चिखल बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु पुन्हा आलेल्या पावसामुळे या मैदानात पाणी साचून राहिले आहे. साचलेले पाणी मोटरने उपसण्यात येत आहे. आता मैदानावर पुन्हा भुसा, त्यावर फ्लेक्स आणि त्यावर खुर्च्या टाकून सभा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like