Chinchwad : मतदान यंत्रावर भाजपचे लक्ष्मण जगताप पहिल्या तर अपक्ष राहुल कलाटे सातव्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रावर  भाजप-शिवसेना महायुतीचे जगताप लक्ष्मण पांडुरंग यांना पहिल्या तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजेंद्र माणिक लोंढे यांचे नाव दुस-या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. तर, अपक्ष कलाटे राहुल तानाजी हे सातव्या क्रमांकावर आहेत.

बॅलेट युनिटवरील अनुक्रमांकही उमेदवारांना प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. हा क्रमांक ठरविताना मराठी नावातील अद्याक्षराच्या बाराखडीतील अनुक्रमांकानुसार ठरविण्यात येतो. त्यामध्येही राष्ट्रीय आणि प्रादेशिक नोंदणीकृत व आयोगाची मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांचे क्रमांक आधी ठरविले जातात. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना आणि नंतर अपक्षांना स्थान मिळते. उमेदवाराने अर्ज दाखल करताना ज्या पद्धतीने नाव दिले असेल (उदा. नाव किंवा अडनाव प्रथम) त्यातील पहिल्या अक्षराचा निकष अनुक्रमांक लावण्यासाठी ठरविले जातो.

मतदान यंत्रावर अशी असणार आहेत उमेदवारांची नावे आणि चिन्ह

1) भाजपचे जगताप लक्ष्मण पांडुरंग – कमळ

2) बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र माणिक लोंढे – हत्ती

3) बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ नामदेव जगताप – ‘खाट’

4)  भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले-  हातगाडी

5) जनहित लोकशाही पार्टीचे नितीश दगडु लोखंडे – ‘ऑटो रिक्षा’

6)  भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर उर्फ अजित प्रकाश संचेती – ‘शिट्टी’

7) अपक्ष कलाटे राहुल तानाजी – ‘बॅट’

8) डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले – ‘हेलिकॉप्टर’

9)  रवींद्र विनायक पारधे (सर) –  ‘कपबशी’

10)   राजेंद्र मारुती काटे (पाटील) – नारळाची बाग

11)  सुरज अशोकराव खंडारे – संगणक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like