Chinchwad : तरुणीस अश्‍लिल फोटो पाठविणाऱ्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज- तरुणी व तिच्या बहिणीस व्हिडिओ कॉल करून अश्‍लिल कृत्य करणाऱ्या तसेच व्हॉटस्‌ऍपवर अश्‍लिल फोटो पाठविणाऱ्या व्यक्‍तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.

याबाबत 19 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 8) चिंचवड पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 8081576008 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी आरोपीने फिर्यादी यांच्या बहिणीस व्हिडिओ कॉल करून अश्‍लिल कृत्य केले. तसेच व्हॉटस्‌ऍपवरही अश्‍लिल फोटो पाठवून विनयभंग केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.