Pimpri: मतदान यंत्रावर राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्यानंतर शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांचे नाव

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रावर प्रथम क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे अण्णा बनसोडे यांना तर शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार यांना दुस-या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. तर, तिस-या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार धनराज गायकवाड यांचे नाव आहे. विरोधी उमेदवारांची नावे एकाखाली एक आली आहेत.

बॅलेट युनिटवरील अनुक्रमांकही उमेदवारांना प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जातो. हा क्रमांक ठरविताना मराठी नावातील अद्याक्षराच्या बाराखडीतील अनुक्रमांकानुसार ठरविण्यात येतो. त्यामध्येही राष्ट्रीय आणि प्रादेशिक नोंदणीकृत व आयोगाची मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांचे क्रमांक आधी ठरविले जातात. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना आणि नंतर अपक्षांना स्थान मिळते. उमेदवाराने अर्ज दाखल करताना ज्या पद्धतीने नाव दिले असेल (उदा. नाव किंवा अडनाव प्रथम) त्यातील पहिल्या अक्षराचा निकष अनुक्रमांक लावण्यासाठी ठरविले जातो.

मतदान यंत्रावर अशी असणार आहेत उमेदवारांची नावे आणि चिन्ह

1) राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा दादू बनसोडे – घड्याळ
2) शिवसेनेचे अॅड. चाबुकस्वार गौतम सुखदेव – धनुष्यबाण
3) बहुजन समाज पार्टीचे धनराज गोविंद गायकवाड – हत्ती
4) बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद गंगाराम हेरोडे – ‘खाट’
5) वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड – ‘गॅस सिलेंडर’
6) भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप कांबळे उर्फ गुरुजी – ‘ब्रेड’
7) अपक्ष अजय चंद्रकांत गायकवाड – ‘हिरा’,
8) अजय हनुमंत लोंढे – ‘शिट्टी’
9) ओव्हाळ मुकुंदा आनंद – ‘फुटबॉल’
10) चंद्रकांत अंबादास माने – ‘पेनाची नीब सात किरणांसह’
11) दिपक दगडू जगताप – ‘शिवणयंत्र’
12) दिपक महादेव ताटे – ‘रोड रोलर’
13) नरेश सुरज लोट – ‘सफरचंद’
14) बाळासाहेब नामदेव ओव्हाळ – ‘अंगठी’
15) मिनाताई यादव खिलारे – ‘प्रेशर कुकर’
16) युवराज भगवान दाखले – ‘ऑटो रिक्षा’
17) डॉ. राजेश नागोसे – ‘कोट’
18) हेमंत अर्जुन मोरे – ‘कपबशी’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.