Loksabha election 2024 : महायुतीचे अधिकृत उमेदवार बारणे यांच्याकडून घटक पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी

एमपीसी न्यूज – शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घटक पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार, शहराध्यक्ष यांच्या कार्यालयात जाऊन खासदार बारणे भेट देत असून चर्चा करत आहेत.

श्रीरंग बारणे यांनी आज ( दि. 4 एप्रिल ) आकुर्डी येथे अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. अण्णा बनसोडे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी माजी हरेश आसवानी, प्रसाद शेट्टी, नारायण बहिरवाडे तसेच राजेंद्र तरस आदी उपस्थित होते.

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी – अजित गव्हाणे

राज्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघात (Loksabha election 2024) श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही पिंपरीचे अण्णा बनसोडे यांनी दिली.महाविकास आघाडीने पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार दिला असला तरी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना अन्य विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी परिस्थिती असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

विकासाच्या मुद्द्यावर होत असलेली ही निवडणूक (Loksabha election 2024) मतदारांनी हाती घेतली आहे. त्यातच अजितदादा पवार यांच्यासारखे ताकदीचे नेते देखील महायुतीत दाखल झाल्यामुळे निवडणूक सोपी झाली आहे. सर्व मित्र पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने काम करून या निवडणुकीत (Loksabha election 2024)  नवा इतिहास घडवून दाखवतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

नेहरूनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे  राहुल भोसले यांच्या कार्यालयासही खासदार बारणे यांनी भेट दिली. राहुल भोसले यांनी बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.