Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय महिला लोकशाही दिन रद्द

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे (Loksabha Election 2024)महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणारा पुणे विभागीय महिला लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाचे उप आयुक्त संजय माने यांनी याबाबत माहिती दिली.

महिला व बालविकास विभागामार्फत दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय (Loksabha Election 2024)महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचार संहिता 16 मार्च ते 6 जून या कालावधीत घोषित केली आहे.
या आचारसंहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने एप्रिल व मे महिन्याचा विभागीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.