Pimpri-chinchwad : डी.वाय.पाटील महाविद्यालयामध्ये एमडीसाठी प्रवेश देण्याच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील महाविद्यालयात (Pimpri-chinchwad) एमडी ( मास्टर  ऑफ  मेडिसिन ) या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देतो असे सांगून तिघांनी मिळून एका महिलेची 19 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जानेवारी ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत तळवडे आणि पिंपरी येथे घडली.

विशाल पवार, भास्कर राव, कुलभूषण कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : वीज दरवाढ दरवाढ मागे न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा सुप्रिया सुळेंचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भास्कर राव हे डॉ. डी वाय पाटील कॉलेजच्या (Pimpri-chinchwad) व्यवस्थापनात काम करत असल्याचे फिर्यादीस खोटे सांगितले. फिर्यादीस एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमाला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून 19  लाख 75 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना प्रवेश न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी  चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.