BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कसबा गणपतीचे दर्शन घेऊन राज ठाकरे मुंबईला रवाना

एमपीसी न्यूज – काल, बुधवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नियोजित जाहीर सभा रद्द करण्यात आली. आज सकाळी राज ठाकरे यांनी कसबा गणपतीची आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर काही वेळातच ते मुंबईला रवाना झाले.

यावेळी त्यांचे पुत्र अमित ठाकरे, कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजय शिंदे, मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईडी चौकशीबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण तेव्हापासून ते शांत होते. राज यांची आज मुंबईत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे मनसेच्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतून फुटणार आहे. आजच्या सभेत ते भाजप – शिवसेनेवर हल्लाबोल करणार असल्याची चर्चा आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like