Pune : ज्येष्ठ पत्रकार, रा. स्व. संघाचे माजी प्रचारक रविकिरण साने यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक, जनसंपर्क क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व रविकिरण साने (वय 68) यांचे आज, सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. गेले काही महिने कर्करोगाशी त्यांनी झुंज दिली.

आज सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गोमंतक, तरुण भारत, ऐक्य अशा विविध दैनिकातून त्यांनी पत्रकारिता केली. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ते जनसंपर्क अधिकारीही होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे स्वीय सहायक म्हणूनही काम केले. ब्राह्मण मानस मासिकाच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण चळवळीतही सक्रिय योगदान दिले. सिम्बायोसिस संस्थेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदालनाचे ते शेवटपर्यंत काम करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.