Pune : रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन कोटींची मदत

एमपीसी न्यूज – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन एकत्रित करून सुमारे दोन कोटींचा निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

कोवीड-19 या जागतिक महामारीचा सामना महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायत्ता निधी-कोवीड-19 मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला असल्याचे शरद पवार यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचे एक महिन्यांचे वेतन सहाय्यता निधीसाठी देण्यात येईल, असे शरद पवार यांनी जाहीर केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.