Mumbai : इंडिया आघाडीची शिवतीर्थावर आज जाहीर सभा ; सोनिया गांधी,शरद पवारांसह अनेक नेते राहणार उपस्थित

एमपीसी न्यूज – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा ( Mumbai) संपूर्ण भारतात सुरु होती. या यात्रेनंतर आज  ( दि .17 )  मुंबईतील शिवतीर्थावर सायं 5 वाजता या  यात्रेचा  भव्य समारोप सभा होणार आहे. याचवेळी  इंडिया आघाडीची लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर पहिली सभा मुंबईत होत आहे. या सभेला सोनिया गांधी,शरद पवारांसह इंडिया आघाडीचे अनेक नेते राहणार उपस्थिती राहणार आहेत.

Today’s Horoscope 17 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

ही भव्य सभा होण्यापूर्वी  राहुल गांधी यांची मुंबईत ‘न्याय संकल्प’ पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही ‘न्याय संकल्प’ पदयात्रा असणार आहे. या सभेला सोनिया गांधी , शरद पवार,  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा  विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडियाचे 15 हून  अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार ( Mumbai) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.