Today’s Horoscope 17 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 17 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 17.03.2024.

शुभाशुभ विचार- 10  नंतर चांगला.

आज विशेष – दुर्गाष्टमी.

राहू काळ – संध्याकाळी 4.30  ते  06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – मृग 16.47 पर्यंत नंतर आर्द्रा.

चंद्र राशी – मिथुन.
—————————–
मेष- ( शुभ रंग- राखाडी)

राशीच्या तृतीयातील चंद्र अनपेक्षित प्रवास घडवेल. काही कंटाळवाण्या माणसांचा सहवास घडू शकतो. मोफत सल्लागारांच्या फार नादी लागू नका, होला हो करून विषय संपवा.

वृषभ – (शुभ रंग- चंदेरी)

मोठेपणा घेण्यासाठी काही खर्च आज करावे लागतील. राशीच्या धनस्थानातील चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवेल. अति स्पष्ट वक्ते पणाने काही नाती दुरावतील.

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)

आज तुम्ही काही से लहरी पणाने वागाल. इतरांचे म्हणणे समजून घडी अवघड जाईल. आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवणे गरजेचे आहे. आज खरे बोलण्यापेक्षाही गोड बोलणे महत्त्वाचे राहील.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

आज आर्थिक व्यवहारात फार रिस्क घेऊ नका. नवीन ओळखीत व्यवहार करूच नका. काहीजण कार्यालयीन कामासाठी प्रवास करतील. मौल्यवान वस्तू सांभाळा.

सिंह – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. तुमची खोटी स्तुती करणारे मित्र आज भेटतील.

कन्या -(शुभ रंग- क्रीम)

नोकरदारांना आज वरिष्ठांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. वरिष्ठ ही तुमच्या कामाची आज दखल घेतील. संततीच्या आरोग्याची काळजी घेणे ही गरजेचे आहे.

तूळ – ( शुभ रंग- जांभळा)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. पण हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. संयम ठेवा. ज्येष्ठांना आज उपासनेची प्रचिती येईल.

वृश्चिक-  ( शुभ रंग- आकाशी)

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेच धाडस नको.

धनु-  (शुभरंग- भगवा)

सगळी महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धातच उरकलेली बरी. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असायला हवी. आज संध्याकाळी जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे.

मकर- (शुभ रंग- गुलाबी)

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरम असेल पती-पत्नीमधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील.

कुंभ-  ( शुभरंग- डाळिंबी)

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

मीन-  (शुभ रंग- मरून)

मंदावलेल्या व्यापारास चांगली गती येईल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही अग्रेसर असाल. प्रेमप्रकरणे डोक्याला तापच देतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.