Pune : शिवतारे यांना आवरण्यासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सरसावले केसरकर आणि शेवाळे!

एमपीसी न्यूज –  मावळनंतर आता बारामती मतदारसंघात देखील ( Pune) महायुतीत वाद होताना दिसत आहे.  सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तगडी लढत होणार असल्याची चर्चा असताना विजय शिवतारेंनी अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्धार केला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारच अशी भूमिका शिवतारे यांनी घेतलेली आहे. त्यातच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. थेट अजित पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना मुंबईत बोलावून घेतले आहे. गुरुवारी  पुण्यावरून थेट हेलिकॉप्टरने मुंबईत येत दुपारी बारा वाजता ते वर्षा बंगल्यावर पोहोचले. ही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांना 7  तास वाट पहावी लागल्याची देखील जोरदार चर्चा होती.

Mumbai : इंडिया आघाडीची शिवतीर्थावर आज जाहीर सभा ; सोनिया गांधी,शरद पवारांसह अनेक नेते राहणार उपस्थिती

तासाभराच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला. शिवाय महायुतीत ज्याला उमेदवारी मिळते त्याच्यासाठी काम करायचं, अशी समज मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर थेट आता मंत्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांनी शिवतारे यांची  भेट घेतली.  या भेटीत नेमकी कशासंदर्भात चर्चा केली.या संदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आली नाही आहे.

मात्र सध्याची परिस्थिती पाहता. शिवतारे यांनी जर बारामतीत माघार घेतली नाही तर याचा फटका थेट अजित पवारांना बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवतारेंची समजूत काढायला आले असावेत, अशी शक्यता आहे. विजय शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदें  यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याचं दिसत ( Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.