Pune : वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍या गुन्हेगाराची काढण्यात आली धिंड

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांकडून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्‍या ( Pune)  गुन्हेगाराची परिसरात धिंड काढण्यात आली. चंदन नगर भागात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी धीरज दिलीप सपाटे याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याची चंदननगर परिसरात धिंड काढण्यात आली.

Pune : शिवतारे यांना आवरण्यासाठी मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सरसावले केसरकर आणि शेवाळे!

सपाटे आणि त्याच्या साथीदारांनी खराडी परिसरात महिन्याभरापुर्वी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्याच्या इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, धीरज सपाटे हा गेल्या महिन्याभरापासून फरार होता. त्याला चंदननगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यानंतर त्याची परिसरातून धिंड काढण्यात ( Pune)  आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.