Pune : पुण्यात 2023 च्या पहिल्या सहामाहीत 45 हजार घरांची विक्री,क्रेडाई पुणे मेट्रोच्या’ अहवालातून  जाहीर

एमपीसी न्यूज – देशातील इतर मेट्रो शहरांच्या (Pune) तुलनेत पुण्यातील बांधकाम व्यवसाय बाजारपेठ ही परवडणारी आणि प्राधान्याने वाढणारी आहे. त्यामूळे 2023 सलाच्या पहिल्या सहा महिन्यात 28 हजार कोटींच्या 45 हजार घरांची विक्री झाली असल्याचे ‘क्रेडाई पुणे मेट्रोच्या’ ‘क्रेडाई सीआरई’ अहवालातून समोर आले आहे.

2019 च्या तुलनेत येथील बांधकाम क्षेत्रातील व्यवहारात तब्बल 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर 2023 च्या पहिल्या सहामाहीत 28 हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Chinchwad : भागवत ज्ञानयज्ञाचा चिंचवड येथे प्रारंभ

‘सीआरई मॅट्रिक्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आणि डेटा विश्‍लेषक राहुल अजमेरा यांनी हा अहवाल नुकताच ‘मेंबर असिस्टंस मिटींग’ मध्ये मांडला. क्रेडाई पुणे मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे समन्वयक कपिल गांधी, व्यवस्थापकीय समिती सदस्य अभिषेक भटेवरा आणि महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर यावेळी उपस्थित होते

अहवालासंदर्भात ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, ‘‘अहवालातील जानेवारी ते जूनमधील आकडेवारीनुसार शहराची बांधकाम व्यवसाय बाजारपेठ ही देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत सर्वांत वेगाने वाढणारी आणि परवडणारी बाजारपेठ आहे. जानेवारी ते जून 2023 दरम्यान पुनर्विक्री वगळून पुण्यात 45 हजार घरांची विक्री झाली आहे. याची किंमत ही तब्बल 28 हजार कोटी रुपये आहे. 2019 च्या तुलनेत यामध्ये 90 टक्के वाढ झाली (Pune) आहे.’’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.