Pimpri : अभिनेते विठ्ठल काळे यांनी महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

एमपीसी न्यूज : बहुचर्चित मराठी चित्रपट (Pimpri) ‘बापल्योक’ चे लेखक आणि चित्रपटात मुलाची दर्जेदार भूमिका साकारणाऱ्या विठ्ठल काळे या हरहुन्नरी अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रमोशनचया निमित्ताने पिंपरीमधल्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशन आणि जर्नालिजम या संभाजीनगरमधल्या विभागाला भेट दिली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ‘बाप’ ही आपल्या आयुष्यातील किती महत्त्वाची व्यक्ती आहे. हे समजावून सांगितले. याबद्दल विद्यार्थ्यांना जाणीव करून देताना आज मी जे काही आहे तो बापामुळे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा चित्रपट लिहल्यानंतर माझे आणि वडिलांचे संबंध आणखी घट्ट झाल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

हा चित्रपट तुम्हाला तुमचा वाटेल, तो तुमचाच आहे हे सांगताना प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहावा असे आवाहन त्यांनी केले.

चित्रपट बनवत असताना लिखाण ते शूट आणि परत डिस्ट्रीब्यूशनच्या काळात येणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल विठ्ठल काळे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी महात्मा फुले महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशन अँड जर्नालिजमच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागतही केले.

Pune : पुण्यात 2023 च्या पहिल्या सहामाहीत 45 हजार घरांची विक्री,क्रेडाई पुणे मेट्रोच्या’ अहवालातून  जाहीर

या कार्यक्रमाला महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, दत्तात्रय हिंगणे, दत्तात्रय बिडबाग, प्रतीक पाटमासे (Pimpri) उपस्थित होते. या वेळी बोलताना प्राचार्य सरोदे यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजची माहिती देतानाच मास कम्युनिकेशन अँड जर्नालिजम हा अभ्यासक्रम खूप विस्तृत आहे. त्यात चित्रपट निर्मिती बद्दलही अभ्यास आहे. त्यामुळे पुढे जावून तुमच्यातला  एखादा विद्यार्थी विठ्ठल काळेप्रमाणे यश मिळवेल आणि तो प्रमुख पाहुणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.