Chinchwad : घर मालकांनो! भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या, अन्यथा होऊ शकतो गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी (Chinchwad) काही जणांनी शहरात भाडेकरू म्हणून वास्तव्य केल्याचे काही प्रकरणांवरून समोर आले. त्यामुळे भाडेकरूंची माहिती पोलिसांना देण्याबाबत आवाहन करण्यात आले. सोशल मीडियावरून देखील पोलिसांनी याबाबत जनजागृती केली. तरीही घरमालक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी पुणे शहरात दोन दहशतवादी आढळले. या कारवाईमुळे राज्यातील गोपनीय यंत्रणांना ‘अलर्ट’ दिला. यापूर्वी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून अटक केलेले दहशतवादी, नक्षलवादी व इतर काही गुन्हेगार शहर परिसरात भाडेतत्त्वावर राहत असल्याचे समोर आले आहे. संबंधित घरमालकांनी पोलीस ठाण्यात त्याची नोंद केलेली नव्हती.

भाडेकरू नोंद करण्यासाठी पोलिसांच्या www.pcpc.gov.in या संकेतस्थळवर लिंक दिली आहे. त्यावरून भाडेकरू नोंदणीची प्रक्रिया करता येते. ऑनलाईनही नोंद करणे शक्य नसलेल्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात एक अर्ज भरून द्यायचा आहे. त्यासाठी भाडेकरू व घरमालकाचे फोटो, सरकारी ओळखपत्र आदींची गरज लागते.

Chinchwad : भागवत ज्ञानयज्ञाचा चिंचवड येथे प्रारंभ

मागील काही दिवसात शहर परिसरात विविध (Chinchwad) पोलीस ठाण्यांमध्ये शेकडो घर मालकांवर भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कलमान्वये दोनशे ते एक हजार रुपये आर्थिक दंड अथवा एक ते सहा महिन्यांपर्यंत कारावास अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, “भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे घरमालकांसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यास संबंधित भाडेकरुची ओळख पटवणे तसेच, त्याचा माग काढणे शक्य होते. माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.