Pune : सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ‘सवाई’ला सुरुवात

एमपीसी न्यूज -पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान या ठिकाणी असलेल्या सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आज सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.

गेली सहा दशके ही प्रथा सुरु असून दरवर्षी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त, कार्यकर्ते आणि संगीतप्रेमी या ठिकाणी जमतात आणि सवाई गंधर्वांबद्दल आदरभाव व्यक्त करीत असतात.

60 च्या दशकात आचार्य अत्रे व तत्कालीन महापौर नाना गोरे यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. तेव्हापासून महोत्सव सुरू होण्याच्या दिवशी सकाळी या पुतळ्याला हार अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली, अशी आठवण यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.