Pune : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी शांतनु गोयल

एमपीसी न्यूज- भंडार्‍याचे जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झालेली आहे गोयल यांच्या रूपाने पालिकेला तिसरे अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत.

राज्यातील 26 आयएसए अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात गोयल यांची बदली करण्यात आली आहे. शांतनु गोयल हे आयएएसच्या 2012 बॅचचे अधिकारी आहेत. गोयल यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील उपविभागीय अधिकारी या पदापासून झालेली आहे. गडचिरोली जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आणि भंडारा जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

राजेद्र निंबाळकर यांची अतिरिक्त आयुक्तपदावरुन एसआरए येथे बदली झाली. त्यामुळे पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त हे पद रिक्त होते. त्या जागी गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.