Pune News : गड आपल्याबरोबर कायम असून सिंहगड देखील आपल्यासोबत :  आमदार रविंद्र धंगेकर 

एमपीसी न्यूज :  शिवजयंती निमित्ताने अनेक घटनांवर आधारित या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. गड आला पण सिंह गेला. (Pune News) पण गड आपल्याबरोबर कायम असून सिंहगड देखील आपल्यासोबत आहे. अशा शब्दात आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते हेमंत रासने यांना लगावला आहे. 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि महायुतीकडून हेमंत रासने हे उमेदवार होते. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाले असून दोन दिवसापूर्वीच मुंबईत सुरू असलेल्या विधी मंडळ अधिवेशना दरम्यान विधी मंडळ सदस्य पदाची शपथ देखील घेतली.रविंद्र धंगेकर यांनी दोन दिवस अधिवेशनास हजेरी लावल्यानंतर आज शिवजयंती निमित्ताने कसबा विधानसभा मतदार संघातील कार्यक्रमाना उपस्थिती लावण्यास पसंती दिली. तर मतदार संघातील कार्यक्रमाची सुरुवात श्री कसबा गणपती (चौक) शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कसबा गणपती मंदिरासमोर भव्य शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमांनी झाली.

या कार्यक्रमास रवींद्र धंगेकर आणि भाजपचे नेते माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने या दोघांना कार्यक्रमाचे आयोजक पुष्कर तुळजापूरकर यांनी निमंत्रित केले होते.निवडणुकी नंतर प्रथमच दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने नागरिक दोन्ही नेत्यांना व्यासपीठावर पाहण्यास उत्सुक होते.पण या कार्यक्रमा स्थळी हेमंत रासने हे नियोजित वेळेनुसार आले होते. (Pune News) त्यावेळी त्यांनी कसबा गणपती मंदिरात जाऊन आरती केली आणि त्यानंतर लाल महाल येथे जाऊन जिजामाता यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुढील कार्यक्रमास ते मार्गस्थ झाले. त्यानंतर अगदी 15 मिनिटानी रविंद्र धंगेकर यांनी हजेरी लावली नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि ते देखील मतदार संघातील अन्य मंडळाच्या कार्यक्रमांना पुढे मार्गस्थ झाले. त्यामुळे शिवजयंती कार्यक्रमात आमदार रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासनेंची भेट टळली असेच म्हणावे लागेल.

Mahavitaran : महावितरणच्या प्रगतीमध्ये  महिलाशक्तीचेही मोठे योगदान

यावेळी रविंद्र धंगेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच कसबा परिसरात असलेल्या लाल महाल या ठिकाणावरून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यास सुरुवात झाली. तसेच मी याच भागात लहानाचा मोठा झालो असून स्वतःला भाग्यवान समजतो. आजपर्यंत शिवजयंतीमधील मिरवणुकीची वारी माझ्या हातून कधीच चुकली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, भवानी पेठ येथील कार्यक्रमाच्या ठिकाणावरून येण्यास उशीर झाल्याने आमची भेट झाली नाही.पण ते माझे सहकारी मित्र असून आम्ही दोघांनी महापालिकेमध्ये एकत्रित काम केले आहे.त्यामुळे आता निवडणुका संपल्या आहेत. (Pune News) पुण्याच आणि विधानसभेच राजकारण आम्ही दोघ बसून करु,तसेच मी सामाजिक कामात कुठे ही राजकारण आणणार नाही. राजकारणाचं युद्ध संपलय आता समाजकारणाचं युद्ध सुरू झालं आहे.त्यामुळे एकत्र हातात हात घालून काम करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

 

 

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून जनतेची सेवा करीत आहोत  :  हेमंत रासने

देशभरात आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिवजयंती साजरी होत आहे. राजकीय आणि समाजिक जीवनात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन काम करीत असून या पुढील काळात देखील करीत राहणार असल्याची भूमिका भाजपचे नेते हेमंत रासने यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.