Pune : ‘शिवजातस्य’ फॅशन शो मधून शिवकालीन संस्कृतीचे सादरीकरण

एमपीसी न्यूज- शिवजयंतीचे निमित्त साधून महा फॅशन फाउंडेशन आणि तष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथील वृंदावन लॉन्स येथे “शिवजातस्य” फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या काळातील पोशाख, अलंकार, पगडी तसेच इतर सामुग्री फॅशन शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमा मधून करण्यात आला. शिवकालीन संस्कृती बरोबरच या वेळी पेशवाई आणि मोघल साम्राज्यातील पेहेराव ही सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तष्टचे दीपक माने यांनी शिवजातस्य विषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आतापर्यंत फॅशन शो च्या माध्यमातून अनेक संकल्पनांवर आधारित विविध प्रांतांच्या पोशाखांचे सादरीकरण करण्यात आले आहे परंतु शिवकालीन साम्राज्यातील पेहेराव पहिल्यांदाच “शिवजातस्य” या फॅशन शो मधून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे”

या अनोख्या फॅशन शो ची संकल्पना महा फॅशन फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गुंड यांची होती. फॅशन शो चे दिग्दर्शन प्रख्यात फॅशन शो कोरिओग्राफर सत्यजित जोगळेकर यांनी केले होते. निवेदन अमोल मोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87ab4a5c391d8728',t:'MTcxNDE4Mzk3OC42OTMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();