BNR-HDR-TOP-Mobile

Pune : श्री शिवराम तरुण मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे

एमपीसी न्यूज – श्री शिवराम तरुण मंडळ आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला आहे.

पुणे लष्कर भागातील सैफी लेनमधील यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणारे श्री शिवराम तरुण मंडळास उद्योगपती बालाजी राव यांनी भेट दिली. यावेळी मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष अध्यक्ष असिफ हारुण शेख यांनी बालाजी राव यांचे स्वागत केले.

यावेळी श्री शिवराम तरुण मंडळाचे प्रमुख रमेश विचारे, प्रमुख मार्गदर्शक सुरेश रासगे, इंद्रजित सकट,काशिनाथ गायकवाड, रहीम सय्यद,राजू रणदिवे, सतीश लांडगे, जितेंद्र जठार, रमेश परदेशी, राजेश गाडे, रॉजर फर्नाडिस,निलेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.