BNR-HDR-TOP-Mobile

Pune : चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

हडपसर पोलिसांची कामगिरी

193
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – चोरीचे 11 गुन्हे उघडकीस आणून हडपसर पोलिसांनी साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. पोलिसांनी आरोपीला चोरीच्या वस्तु विकताना सापळा रचून करकरे गार्डनजवळ अटक केली आहे.

.

मोहम्मद अन्वर बागवान (वय 22 रा. वरद विनायक कॉलनी, भेकराईनगर, गंगानगर हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी  रात्रीच्या वेळेस व दिवसा उघड्या असलेल्या दरवाजा, खिडकीतून मोबाईल लॅपटॉप चोरी करायचा
.हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या घरफोड्या व इतर चोरीच्या अनुषंगाने गस्त घालत असताना पोलीस कुसाळकर व चित्ते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, करकरे गार्डन जवळ लॅपटॉप मोबाईल फोन विकण्यासाठी एक व्यक्ती फिरत आहे.

पोलिसांनी आरोपीस सापळा रचून अटक केली आणि झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या बागेत लॅपटॉप व मोबाईल आढळून आले, त्याच्या जवळ अधिक चौकशी केली असता त्याने अनेक ठिकाणी मोबाईल दुचाकी चोरल्याची कबुली केले. आरोपी बागवान हा अनेक महिन्यांपासून चोऱ्या करत होता.या चोरीच्या वस्तू विकून मिळालेल्या पैशातून तो चैन करायचा.तपासामध्ये हडपसर पोलिस स्टेशनमध्ये 10, लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत 1 असे अकरा गुन्हे उघडकीस आले.

पोलिसांनी त्याच्याकडून 11 दुचाकी 25 मोबाईल फोन 1 लॅपटॉप असा एकूण 6 लाख 30 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: