Sangavi : मुलांना मारून टाकण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार ; आरोपी गजाआड

0 1,112

एमपीसी न्यूज – महिलेबरोबर ओळख वाढवून जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली.  हा प्रकार 2014 पासून 11 जानेवारीपर्यंत 2019 पिंपळे-गुरव येथे घडला. आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

HB_POST_INPOST_R_A

गणेश पांडूरंग निकम (वय 40, रा. सुदर्शन नगर, पिंपळे-गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेबरोबर ओळख वाढविली. तसेच पतीबरोबर घटस्फोट झाल्यानंतर लग्न करण्याचे अमिष दाखविले. शारिरीक संबंध ठेवण्यास विरोध केल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तुझ्या मुलांना मारून टाकीन, अशी धमकी दिली. सांगवी ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: