Aundh : पत्नी व्हाट्सअपवर चॅटींग करते म्हणून पतीकडून पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पत्नी ही व्हाट्सअपवर चॅटिंग करत असते; या रागातून (Aundh) पतीने पत्नीचा गळा दाबून तिला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवार ते बुधवार या कालावधीत औंध येथील रक्षक चौक परिसरात घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित महिलेचे पती व सासरे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : पुणे-मुंबई महामार्गावर काळभोरनगर येथील आउट पास ठरतोय धोकादायक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही व्हाट्सअप चॅटवर बोलते याचा राग मनात धरून पती हा वेळोवेळी दारू पिऊन येऊन फिर्यादीला मारहाण करत होता. बुधवारी त्याने याच रागातून फिर्यादीच्या गळ्यात दोरीचा फास लावून दोरी घरातील सिलिंग फॅनला बांधून फिर्यादीला खुर्चीवर उभे करून खालील खुर्ची ढकलून दिली.

यावेळी फिर्यादीचे सासरे घरात असताना देखील त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला (Aundh) नाही. स्वतःच जीव वाचवल्यानंतर फिर्यादी यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत पती व सासऱ्या विरोधात तक्रार दाखल केली असून सांगवी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.