Snooker Tournament: स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा 2022 !

एमपीसी न्यूज: द क्यु क्लब तर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत (Snooker Tournament) हरप्रीत सैलेना, आझिम एच.,अनिल कुमार, पराग गणेश, अझहर अली, सुशिल रसाळ, अजय कोलानी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

 

 

वडगांव-शेरी येथील द क्यु क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीत हरप्रीत सैलेना याने इम्रान वादवाला याचा 63-25, 76-53, 37-66, 58-36 असा पराभव केला. (Snooker Tournament) अजय कोलानी याने पुनित कुमार याचा 3-1 असा सहज पराभव केला. अजय याने पहिल्या दोन फ्रेम 54-27, 50-17 अशा जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. पुनित याने 51-35 अशी तिसरी फ्रेम जिंकत सामन्यात कमबॅक केले. चौथी फ्रेम अजय याने 64-38 अशी जिंकून आगेकूच केली. पुण्याच्या सुशिल रसाळ याने गिरीश शेलके याचा 66-53, 55-35, 71-31 असा सरळ फ्रेममध्ये सहज पराभव केला.

 

Babasaheb Purandare Award: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार डॉ. देगलूरकर यांना प्रदान

 

अझहर अली याने एच.एस. शर्मा याचा 61-59, 45-53, 56-26, 52-42 असा पराभव करून आपले आव्हान कायम ठेवले. (Snooker Tournament) पराग गणेश याने वरूण भगत याचा 54-18, 36-48, 57-51, 62-22 असा पराभव केला. अनिल कुमार याने हकीम शेख याचा 40-29, 18-56, 53-45, 58-37 असा 3-1 अशा फरकाने पराभव केला. आझिम एच. याने अंकुश खैरमोडे याचा 41-62, 61-22, 50-23, 55-39 असा पराभव करत आगेकूच केली.

स्पर्धेचा निकालः पात्रता फेरीः

अजय कोलानी वि.वि. पुनित कुमार 54-27, 50-17, 35-51, 64-38;
सुशिल रसाळ वि.वि. गिरीश शेलके 66-53, 55-35, 71-31;
अझहर अली वि.वि. एच.एस. शर्मा 61-59, 45-53, 56-26, 52-42;
पराग गणेश वि.वि. वरूण भगत 54-18, 36-48, 57-51, 62-22;
अनिल कुमार वि.वि. हकीम शेख 40-29, 18-56, 53-45, 58-37;
आझिम एच. वि.वि. अंकुश खैरमोडे 41-62, 61-22, 50-23, 55-39;
हरप्रीत सैलेना वि.वि. इम्रान वादवाला 63-25, 76-53, 37-66, 58-36;

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.