Pune : विशेष मुलामुलींनी दिला पथनाट्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

एमपीसी न्यूज- पर्यावरण रक्षण हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत असताना विशेष मुलामुलींनी देखील आपण या कामात मागे नाही हे दाखवून दिले आहे. या विशेष मुलामुलींनी पुण्यात विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

पुण्यात विशेष मुलामुलींसाठी काम करणाऱ्या नवक्षितिज संस्थेच्या माध्यमातून गांधी जयंती निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार व संभाजी उद्यान इथे या मुलामुलींनी आपल्या अभिनयातून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

यावेळी नवक्षितिज संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष नीलिमा देसाई म्हणाल्या, ” 2003 मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेत जवळपास 90 विशेष मुले मुली असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. विशेष व्यक्तींबद्दल समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात पथनाट्य, पदयात्रा, डान्स कॉम्पिटीशन यांचे आयोजन केले जाते. तसेच ते या मुलांचा दिवस सार्थकी लागावा यासाठी चॉकलेट, आकाशकंदील, यांसारख्या वस्तू बनविल्या जातात”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.