Pune : करिअर आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज – सृजन आणि फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. शिबिरात प्रशासकीय सेवेतील, यशस्वी उद्योजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिरासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पुणे जिल्हा परिषेदेचे विद्यमान सदस्य आणि इंडियन शुगर मिल्स असोसिअशनचे अध्यक्ष रोहित राजेंद्र पवार, पुणे जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कुलकर्णी आदी उपस्थित होते.

रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय व संधी या विषयावर मार्गदर्शन केले. रोहित पवार अवघ्या 21 व्या वर्षी उद्योगक्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. तसेच त्यांनी युवकांमधील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सृजनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. आपल्या व्यवसायातील व महाविद्यालयीन जीवनातील अनुभव सांगितले. व्यवसाय सुरू करताना कशाचीही लाज बाळगू नका हा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.

डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्पर्धा परीक्षा व संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रशासकीय अनुभवाचे व आदिवासी पाड्यातील एक सामान्य विद्यार्थी ते आयएएस आधिकारी अशा आपल्या खडतर जीवनप्रवासाचे काही पैलू त्यांनी उलगडून सांगितले. महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद सदस्य म्हणून बिरुदावली मिळवलेले अभिजित तांबिले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.