Akurdi: ‘पीसीईटी’च्या विज्ञान स्पर्धेत शिवाजी विद्यालय प्रथम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्स मध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान, वादविवाद आणि प्रश्नोत्तर स्पर्धेत देहूरोड येथील शिवाजी विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. तर, एस. बी. पाटील कनिष्ठ विद्यालयास व्दितीय आणि एच.ए. स्कूलला तृतीय क्रमांक मिळाला.

या स्पर्धेस शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) चे विज्ञान अधिकारी वैभव घोलप यांच्या हस्ते विजेत्या संघांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनास संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्या अनुजा कामठे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, ट्रेनिंग-प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. प्राजक्‍ता जोशी यांनी प्रदर्शनाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.