Pune : महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या लघुपटासाठी 2 लाख 99 हजार अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी 

एमपीसी न्यूज – समाजप्रबोधनपर लघुपट निर्माण करण्यासाठी पुणे महापालिका कर्मचार्‍यांना 2 लाख 99 हजार रुपयांची देणगी देण्यासाठी वर्गीकरण करण्याला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खेळात यशस्वी होऊन नावलौकिक मिळविण्याचे स्वप्न पाहणारी मुले आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी विशेष प्रयत्न करणार्‍या पालकांच्या जीवनावर आधारीत हा लघुपट आहे. लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत व निर्मिती मनपा कर्मचारी करणार आहेत. पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या सहकार्याने निर्मिती करण्यात येणार आहे.

कर्मचार्‍यांच्या कलागुणांना वाव देणे व समाजप्रबोधन या उद्देशाने या आर्थिक तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे. लघुपट निर्मितीसाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च येणार आहे. निम्मा खर्च कर्मचारी करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.