Pune – सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार श्रीपाल सबनीस विचारधारा’चे प्रकाशन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि संस्कृती प्रकाशन यांच्या (Pune) संयुक्त विद्यमाने ‘डॉ. श्रीपाल सबनीस विचारधारा प्रारूप आणि अंतरंग’ या ग्रंथाचे आणि ‘डॉ. श्रीपाल सबनीस विचारधारा’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या बुधवारी दि. 17 होणार आहे. सुरेश सावंत, आशुतोष भूपटकर आणि आर. डी. साबळे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या अध्यक्षेतेखाली पत्रकारभवन, गांजवे चौक येथे होणार आहे. ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील, प्रसिद्ध समीक्षक डॉ. रणधीर शिंदे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

NCP : भाजप हटाव देश बचाव’ला कर्नाटकमधून प्रारंभ – अजित गव्हाणे

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या 60 ग्रंथांवर संशोधन करून संपादकांनी ही विचारधारा शोधली व मांडली आहे. 440 पानांच्या या ग्रंथांत ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे, नरहर कुरुंदकर यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील मान्यवर लेखकांनी लिहिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सचिन इटकर आणि संस्कृती प्रकाशनाच्या सुनिताराजे पवार यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.