NCP : भाजप हटाव देश बचाव’ला कर्नाटकमधून प्रारंभ – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज – महागाई, भ्रष्टाचार आणि जातीय राजकारणाला (NCP) कंटाळलेल्या कर्नाटकमधील जनतेने भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर दिले आहे. ‘भाजप हटाव देश बचाव’ला कर्नाटकमधून प्रारंभ झाल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला आहे.

Pimpri News: पुण्यातील विद्युत दाहिनीत शहरातील मृत जनावरांचे दहन

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकहाती सत्ता काबीज केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात गव्हाणे यांनी म्हटले आहे की, देशातील लोकांचा मुड बदलत आहे. मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे देशात मोदी सरकारविरोधात जनमत तयार होत आहे. याचा (NCP) प्रत्यय कर्नाटक विधानसभा निकालातून आला आहे. तसेच आगामी लोकसभा आणि राज्यातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनताही भाजप आणि शिंदेसेनेला धडा शिकविणार आहे, असल्याचेही गव्हाणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.