Pune :भाजप सोशल मीडिया सेल पुणे च्या सह संयोजक पदी तनिष्क कुलकर्णी

एमपीसी न्यूज -स्थापत्य अभियंता असलेला 22 वर्षीय भाजप युवा कार्यकर्ता (Pune)तनिष्क कुलकर्णी याची भाजप पुणे सोशल मिडिया सेलच्या सह संयोजक पदी नेमणूक करण्यात आली असून त्याने नुकतेच भाजप पुणे सोशल मीडिया सेल चे संयोजक निखिल पंचभाई यांच्या उपस्थितीत भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते सह संयोजकपद नियुक्ती पत्र स्वीकारले.

आमदार चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, पुनित जोशी (Pune)आणि निखिल पंचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तयार झालेला तनिष्क कुलकर्णी हा युवा कार्यकर्ता अगदी लहान वयापासूनच समाज आणि राजकारणात सक्रिय आहे. त्याने शालेय जीवनात असतानाच अनेक गणपती मंडळे, पोलीस मित्र तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कारकिर्दीची सुरुवात केली.

 

Chakan : विनापरवाना जनावरांची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

महाविद्यालयीन काळात एमआयटीमध्ये संयुक्त सरचिटणीस म्हणून निवडून आल्यावर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रियपणे काम केले. 2014 मध्ये भाजप कार्यकर्ता म्हणून राजकारणात सक्रिय झाल्यावर 2016 मध्ये तनिष्क ने पहिल्यांदा भाजप युवा मोर्चाच्या सोशल मीडिया सरचिटणीस पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.

दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा निवडणुकी मधे सक्रिय सहभाग नोंदविला. 2020 मधे भाजप सोशल मीडिया सेल कोथरूड विधानसभेचा निमंत्रक म्हणून जबाबदारी पार पाडली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.