Pune : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नियोजित प्रकट मुलाखत तात्पुरती रद्द

एमपीसी न्यूज – पुणे येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिनांक 28 आणि 29 रोजी आयोजित 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नियोजित प्रकट मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत ही मुलाखत घेणार होते. मात्र, राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या काही दिवसातच ही मुलाखत आयोजित करण्यात येईल. तसेच दिनांक 28 आणि 29 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे आयोजित 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनातील उर्वरित सर्व कार्यक्रम नियोजित वेळेतच होणार आहेत, असे साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि.दा. पिंगळे यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.