Pune : पाणीपुरवठा विभागाची गुरुवारची देखभाल दुरुस्ती पुढे ढकला : संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज – गुरुवार (दि. २६ डिसेंबर) रोजी संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी बंद राहणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

मात्र, दि.२५ डिसेंबर रोजी दर्श अमावस्या असून दिनांक २६ डिसेंबर रोजी सूर्यग्रहण आहे. हिंदू धर्मात ग्रहणकाळानंतर स्नान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा बंद राहिल्यास व दुसऱ्या दिवशी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. त्यामुळे गुरुवार ऐवजी अन्य दिवशी देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी केले आहे. यासंदर्भातील निवेदन महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धिरज घाटे यांना देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.