Pune : वन विभागाने पकडलेल्या 6 शिकाऱ्यांना कोर्टाने दिली 4 दिवसांची फॉरेस्ट कस्टडी

एमपीसी न्यूज : वन विभागाने (Pune) पकडलेल्या 6 शिकाऱ्याना कोर्टाने 4 दिवसांची फॉरेस्ट कस्टडी दिली आहे. अशी माहिती ओत्तूर येथील वन परीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली आहे.

ऋतिक काळे, उत्तम जाधव, अजय कडाळी, अमोल काळे व तुषार जाधव (सर्व रा. निरगुडे तालुका, जुन्नर जिल्हा पुणे) आणि रंगनाथ जाधव (रा. गुळुंचवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) या सहा आरोपींना जुन्नर येथे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी चार दिवसांची फॉरेस्ट कस्टडी सुनावली आहे.

ओत्तूर वन परीक्षेत्राच्या अंतर्गत मौजे आनंदवाडी गावाच्या परिसरात तरलदरा (नंबरेवस्ती) जवळ यमुनाबाई आहेर यांच्या मालकी गट नंबर 173 पडीक क्षेत्रात रात्रगस्त करत असताना काही लोक बॅटरी घेऊन फिरताना दिसून आले. त्या इसमांकडे चौकशी व तपासणी केली असता त्यांच्याकडे वाघुर (जाळे), गलोल, तारेचे फासे, कोयते मिळाले. हे इसम शिकारीच्या उद्देशाने फिरताना रात्रगस्त करताना आढळून आले.

Pimpri news: पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी – सतीश काळे

या इसमांवर (Pune) वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 2, 16 (ब), 9, 39 (1) (डी ), 50, 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.