Pimpri news: पोलिसांवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी – सतीश काळे

एमपीसी न्यूज : पालकमंत्र्यांवर झालेल्या शाई फेक प्रकरणी पिंपरी चिंचवड (Pimpri news) शहरातील पोलिसांना नाहक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. शहर पोलिसांकडून नेहमीच सर्वसामान्य जनतेसह नेते मंडळींच्या सुरक्षा उत्कृष्टरित्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या कामाच्या निष्ठेची पोचपावती दिल्यास ते आणखी चांगली कामगिरी करू शकतील. त्यामुळे पोलिसांचे केलेले निलंबन मागे घ्यावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले आहे.

काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. ही जबाबदारी ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांसह सुरक्षा व्यवस्थेत उत्तम कामगिरी बजावत आहेत. शहरात पोलीस संख्या कमी आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचा बोजा त्यांना सहन करावा लागत आहे. कामाचा ताण येत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामध्येच शहरात पालमंत्र्यांच्या अंगावर शाई फेकण्याची घटना घडली. यामध्ये पोलिसांचे केलेले निलंबन त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. हे निलंबन तातडीने मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा, असे आवाहन काळे यांनी केले.

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण हवे – Pimpri news

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. पत्रकार आपले काम नित्यनेमाने करतात. कार्यालयाच्या वतीने आलेल्या सूचनांचे पालन करतात. बातमीत वेगळेपणा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये काही पत्रकारांना राजकीय रोष देखील पत्करावा लागतो. शाई फेक प्रकरणात अशाच पद्धतीने वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना चौकशीसाठी ताब्यात घेणे देखील अयोग्य आहे. त्यांना त्रास न देण्याचे आवाहन काळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.