Chandrakant Patil : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागितली जाहीर माफी; पुण्याचे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये सध्या (Chandrakant Patil) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन तसेच त्यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच, अनेक आंदोलनेही होत असल्याने पुण्यात अशांतता आणि अस्थिरता वाढत असल्याने अखेर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागितली आहे. एवढेच नव्हे, तर कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांची कारवाई मागे घेण्यासाठी पुन्हा एकदा सूचना केली आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

जय महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पवित्र स्मृतीस आणि त्यांच्या अनुकरणीय कृतीस मी सदैव वंदन करत आलो आहे. माझ्या कृतीत त्यांचे अनुकरण करत आलो आहे. त्यांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलीच आहे. पण, त्यावरून घडलेल्या घटना माझ्या मनाला क्लेषदायक ठरल्या आहेत.

शिवरायांच्या एका मावळ्यावर असे आरोप लावले जावेत, याचे वाईट वाटत आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र अशांतता होऊ नये असे मला वाटते. मी पुन्हा एकदा या विषयात कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर जाहीर माफी मागतो.
माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच, ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे, त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तीही मागे घ्यावी. तसेच, जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी, अशी (Chandrakant Patil) सूचना करतो आहे.

माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली, त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती. असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा जाहीर माफी मागितली आहे.

Pimpri News: शाईफेक करणा-यांवरील कठोर कलमे मागे घ्या; सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरे यांची भेट

कारवाई मागे घेण्याची सूचना – 

घडलेल्या प्रकरणात कोणाविषयी काहीही तक्रार नाही म्हणत पोलिसांपासून कारवाई झालेल्या पत्रकारापर्यंत गुन्हे आणि कारवाई मागे घेण्याची त्यांनी सूचना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.