Pune : येत्या शनिवारपासून चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल वाहतूकीसाठी होणार खुला

एमपीसी न्यूज – वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आलेला चांदणी ( Pune) चौकातील नवा उड्डाणपूल येत्या शनिवारपासून (दि.12) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे सुलभ होणार आहे. या नव्या उड्डाणपुलाला सुशोभीकरणाचा साजही देण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिमद्वाराकडील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असून दहा महिन्यांच्या विक्रमी काळात उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. चांदणी चौक शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. मात्र अरुंद रस्त्यामुळे चांदणी चौकात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर जुना पूल पाडून नव्याने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय जाहीर झाला. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आणि जुन्या उड्डाणपुलाचा प्रश्न ऐरणीवर आला.

Chikhali : रिव्हर ग्राऊंड भाडेतत्वार दिले हॉर्स रायडिंगसाठी, स्थानिकांमध्ये संताप  

चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. दोन ऑक्टोबर रोजी जुना ( Pune) पूल पाडण्यात आल्यानंतर नव्या उड्डाणपुलासाठी काम सुरू करण्यात आले. त्यानंतर अडचणींवर मात करत उड्डाणपूलचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर करण्यात आल्या. हा नवा उड्डाणपूल 115 मीटर लांब असून 36 मीटर रुंदीचा आहे.

एनडीए, मुळशीकडून येऊन बावधन, पाषाण, वारजे आणि कोथरूडकडे जाणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असून एनडीए, मुळशी कडून येऊन मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. मुंबईकडून येऊन बावधन किंवा पाषाणला जाण्यासाठी महामार्गावरील पाषाण जोड रस्त्याने (विवा ईन हॉटेल) जाता येणार आहे.

मुंबईकडून येऊन मुळशीकडे जाण्यासाठी कोथरूड भुयारी मार्गाने एनडीए चौक मार्गे वेदविहार, मुळशी, एनडीएला जाता येणार आहे. बावधन, पाषाणकडून वारजे, कात्रजकडे जाण्यासाठी पाषाण कनेक्टर रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

कोथरूड ते   वारजे ही वाहतूक सातारा महामार्गावरील सेवा रस्त्यावरील शृंगेरी मठाजवळून महामार्गाने जाणार आहे. वारजे, साताऱ्याकडून येऊन पाषाण, बावधनकडे जाणाऱ्यांना नवीन उड्डापुलाच्या स्वतंत्र मार्गिकेवरून मुळशी रस्त्याला येता येणार आहे. यामुळे चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्याची ( Pune) शक्यता आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.