Chikhali : रिव्हर ग्राऊंड भाडेतत्वार दिले हॉर्स रायडिंगसाठी, स्थानिकांमध्ये संताप  

एमपीसी न्यूज –   मोशी, चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी ग्राऊंड महापालिकेने हॉर्स रायडिंगसाठी (Chikhali) भाड्याने दिले आहे. हॉर्स रायडिंग हा खेळ उच्चभ्र लोकांचा आहे. चिखली परिसरातील सर्वसामान्य नागरिक राहतात. त्यामुळे प्रशासनाने सर्वसामान्यांचा विचार करुन हे ग्राऊंड भाडे तत्वार देवू नये. सर्वसामान्य, स्थानिक खेळाडुंसाठी हे ग्राऊंड खुले ठेवावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मोशी परिसरातील सर्व सोसायटीच्या खेळाडूंना आपले आरोग्य सांभाळण्यासाठी व मुलांना खेळासाठी प्रवर्त करण्यासाठी एकच मैदान शिल्लक होते. तेही प्रशासनाने स्थानिक लोकांना कोणतीही कल्पना न देता व कुठलीही नोटीस न देता हे ग्राउंड भाडेतत्त्वावर बलाढ्य लोकांसाठी हॉर्स रायडिंगसाठी देण्यात आलेले आहे.

Daund : विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकाने नैराश्यातून केली आत्महत्या

आसपासचे सर्व सोसायटी ऐश्वर्या हमारा आर के एच रिव्हर रेसिडेन्सी, वास्तु ड्रीम, क्रिस्टल सिटी, स्वराज व इतर अनेक सोसायटी मधील जवळपास 500 ते 700 खेळाडू या ग्राउंड वरती रोज खेळत असतात. वर्षातून अनेक महिने मोठे टूर्नामेंट भरवले जातात. अनेक करमणुकीचे मोठे खेळ या ग्राउंड वरती खेळवले जातात. थोडा विसावा या ग्राउंडवर मिळत होता. तोही आज संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला आहे.

स्थानिक रहिवाशी मारुती तांबोळ म्हणाले, स्थानिक खेळाडूंसाठी मोकळे मैदान एकच आहे. बाजुला कोणतेच मैदान नाही. आम्हाला खेळण्यासाठी मोकळे मैदान असावे. सामान्य मानसांची दखल न घेता प्रशासनाने भाडेतत्वार मैदान दिले. हॉर्स रायडिंग हा उच्चवर्णीयांचा खेळ आहे. सर्व सामान्यांसाठी हे मैदान ठेवावे. अन्यथा आंदोलन करणार (Chikhali) आहोत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.