Daund : विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने शिक्षकाने नैराश्यातून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज – दौंड तालुक्यात  एक धक्कादायक बातमी समोर (Daund) आली आहे. एका प्राथमिक शाळेतील 46 वर्षीय शिक्षकाने विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेतील दहापैकी 9 विद्यार्थ्यांनी जवळच्या दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतल्याने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. अरविंद देवकर असे शिक्षकाचे नाव आहे.

Alandi : आळंदीत डोळे लागण रुग्ण संख्येत वाढ; नवीन रुग्ण संख्या 106

अरविंद देवकर यांनी शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी तणनाशक अंगात मोठ्या प्रमाणात भिनल्याने त्यांच्यावर सुरुवातीला उरुळी कांचन येथे उपचार करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर पाच दिवसांनी हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी हद्दीतील जिल्हा परिषदेच्या होलेवस्ती प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. या शिक्षकाने शाळेतील कामे विद्यार्थ्यांना करायला सांगितल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत टाकले. त्यामुळे शिक्षकाला याचा पश्चाताप झाला आणि त्या निराशेतूनच शिक्षकाने आपले आयुष्य संपवले. आत्महत्या केलेल्या शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ज्यामधून या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. माझ्याकडून समाजाचे नुकसान झाल्याने याच पवित्र मंदिरात मी माझ्या देहाचा त्याग करत आहे. याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. असे त्यांनी म्हणले आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने दौंड तालुका हादरुन गेला  (Daund) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.