Pune : मुख्यमंत्री शिंदे यांना उडविण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Pune) उडवणार आहे. अशी धमकी देणाऱ्या इसामाला वारजे माळवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.10) रात्री शासनाच्या 112 या नंबर वरती एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे. अशी धमकी दिल्याचा कॉल आला होता.

राजेश मारुती आगवणे ( वय 42 वर्षे, मूळ रा. वडगाव निबाळकर, ता. बारामती, सध्या राहणार धारावी मुबंई ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती नियंत्रण कक्षातून रात्री उशिरा वारजे माळवाडी पोलीस ठाण्याला प्राप्त झाली. त्यानुसार वारजे पोलिसांनी माहिती काढली असता वारजेतील आकाश नगर येथून सदर फोन केल्याचे दिसून आले.

त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नंबर वरून फोन केले ते दोन्हीही नंबर बंद झाले होते.

नंतर सीडीआर च्या मार्फत तांत्रिक विश्लेषण करून संशयिताच्या घरचा पत्ता मिळवला. सद्गुरु बिल्डिंग, आकाश नगर वारजे येथून या इसमाला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याची पत्नी सारिका पुण्यात नोकरी करत असल्याने तिला भेटायला (Pune) आला होता.

दरम्यान त्याने आकाश नगर येथील त्याच्या पत्नीच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार असल्याच्या धमकी देणारा कॉल 112 नंबर वर केला असल्याचे दिसून आले. त्यामुळे वारजे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 506 ( 2 ) याप्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Hadapsar : पत्नीला शेजारच्याने गाडीवरून सोडले; पतीने केली तीक्ष्ण हत्याराने मारहाण

वरील कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार व वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके व त्यांच्या साथीदाराने ही कारवाई करून सदर इसमाला ताब्यात घेतला आहे. त्याला पुढील तपासणी कामे ससून हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशन करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.