Hadapsar : पत्नीला शेजारच्याने गाडीवरून सोडले; पतीने केली तीक्ष्ण हत्याराने मारहाण

एमपीसी न्यूज : शेजारी राहणाऱ्याने पत्नीला (Hadapsar) दुचाकीवरून घरी आणून सोडल्याने पतीसह तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. हडपसरच्या साडे सतरा नळी परिसरात ही घटना घडली असून, यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अंतम गायकवाड (वय ३७, रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Pune : पाळीव श्वानाने रस्त्यात विष्ठा केल्याने वाद; अंगावरील कपडे फाडून महिलेला मारहाण

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अंतम व आरोपी शेजारी राहण्यास आहेत. दरम्यान, अंतम याने त्याच्या दुचाकीवरून आरोपीच्या पत्नीला बाहेरून घरी आणून सोडले. ते पाहिल्यानंतर दोघांत वाद झाला.

त्यानंतर (Hadapsar) तिघांनी धारदार शस्त्राने अंतम यांच्या डोक्यात वार करून तसेच त्यांना लाकडी बांबूने बेदम मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. तर, हे भांडण सोडविण्यास बहिण व भाचा आला असता त्यांनाही तिघांनी मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.