Pune : पाळीव श्वानाने रस्त्यात विष्ठा केल्याने वाद; अंगावरील कपडे फाडून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज : पाळीव श्वानाने रस्त्यात विष्ठा केल्याने झालेल्या (Pune) वादातून एका तीस वर्षीय महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आझाद नगर येथे 6 एप्रिल रोजी हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी एका महिलेने तक्रार दिली असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर माणगावकर, दोन महिला आणि एका अनोळखी पुरुषावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 30 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

Swargate : स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार अड्डा उध्वस्त; 13 जुगारी ताब्यात

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या पहाटे आठ वाजण्याच्या सुमारास पाळीव श्वानाला घेऊन रस्त्याने जात होत्या. यावेळी त्यांच्या श्वानाने भर रस्त्यात विष्ठा केली. ही विष्ठा साफ करावी यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला.

त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी या संपूर्ण घटनेचे (Pune) मोबाईल मध्ये फोटो काढत असताना आरोपीने त्यांच्या हातातील फोन जबरदस्तीने काढून घेत त्यांचा हात मुरगाळला आणि इतर आरोपींना बोलावून घेत कपडे फाडून त्यांना रक्त येईपर्यंत मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.