Pune : लग्नासाठी तरुणाने एकतर्फी प्रेमातून केले स्वतःवरच वार

एमपीसी न्यूज : एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्वत:च्या पोटावर (Pune) चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तरुणीचा चोरून पाठलाग देखील केला होता.

प्रसाद चंद्रकांत दांगट (वय 34, रा. वडगांव बुद्रुक) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात 32 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

Pune : मुख्यमंत्री शिंदे यांना उडविण्याची धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रुग्णालयाकडून खबर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. प्रसाद याचे तक्रारदार तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे. तो तरुणीचा चोरून पाठलाग करत असत. त्याने या तरुणीला लग्न कसे करत नाहीस बगतोच असे म्हणत शिवीगाळ देखील केली.

त्यानंतर त्याने स्वत:च्या पोटावर चाकूने वार केले. त्यात तो जखमी झाल्याने (Pune) त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी पोलिसांना या घटनेची खबर मिळाली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.