Pune : तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाने तहसीलदारांसाठी मागितली दीड लाखांची लाच

एमपीसी न्यूज – सातबारा उताऱ्यावरील पोकळीस्त असलेली नोंद कमी करण्यासाठी(Pune) हवेली वर्ग तीन या तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाने एका शेतकऱ्याकडे दीड लाखांची लाच मागितली. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली असता एसीबीने पडताळणी करून अव्वल कारकुनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नरेंद्र भानुदास ढोले (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या अव्वल कारकुनाचे(Pune) नाव आहे. याप्रकरणी 47 वर्षीय शेतकऱ्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची जमीन पश्चिम चक्राकार मार्गासाठी संपादित होणार आहे. या जमिनीची नुकसान भरपाई म्हणून त्यांना शासनाकडून 34 लाख 20 हजार 348 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे तक्रारदार यांच्या जागेच्या सातबारा उताऱ्यावरील पोकळीस्त असलेली नोंद तहसील कार्यालयाकडून कमी होणार होती. त्याबाबत हवेली तहसीलदार कार्यालयात त्यांचा अर्ज आला होता.

Kalewadi: गाडी खरेदीच्या बहाण्याने नागरिकाची 4 लाख रुपयांची फसवणूक

हे काम करण्यासाठी अव्वल कारकून नरेंद्र ढोले याने तहसीलदार यांच्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. शासकीय कामासाठी लाच मागितली गेल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने 8, 9 फेब्रुवारी, 14, 15 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी आणि 20 मार्च रोजी पडताळणी केली. त्यामध्ये ढोले याने लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार 22 एप्रिल रोजी खडक पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.